Your Own Digital Platform

भुईंज- चिंधवली मार्गावर बैलगाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू


स्थैर्य, भुईंज : भुईंज -चिंधवली रस्त्यावर शेतात उसाच्या बियाण्याची वाहतूक करताना अचानक बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडी खाली सापडून शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील शेतमजुराचे नाव बळीराम छगन मंगवडे (वय, 38) असे आहे.
 
याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना सदर घटनेची माहिती मिळल्यानंतर त्यांनी स्वतः या बाबत घटनास्थळी कुटुंबियांशी चर्चा करून या भागाचे तलाठी आणि सर्कल यांना सुचना दिल्या.