Your Own Digital Platform

स्व.इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


स्थैर्य, सातारा : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
 
जिल्हाधिकारी सिंघल यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या विविध कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.