फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

स्थैर्य, मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातव्या स्मृतिदिनी मुंबई येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि अन्य मान्यवर.


स्थैर्य, मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी अभिवादन केले. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे राजकीय खटके उडालेले असताना फडणवीस यांनी स्मृतीस्थळाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन केलं.

दरम्यान, बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी भाजप नेते शिवतीर्थावर येणार की नाही अशी चर्चा होत होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. मात्र, चिडलेल्या शिवसैनिकांनी ‘मी पुन्हा येईन’च्या घोषणा दिल्या.

No comments

Powered by Blogger.