Your Own Digital Platform

हणमंतराव पवार हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

स्थैर्य, फलटण : येथील हणमंतराव पवार हायस्कूलमध्ये सन 2001 च्या दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी शिक्षक व माजी विद्यार्थी.

स्थैर्य, फलटण : सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलच्या फलटण येथील 2001 च्या दहावीतील मुलांचा तब्बल 19 वर्षांनंतर फलटण येथे स्नेहमेळावा साजरा झाला या वेळी खूप वर्षांनी जुने मिञ ,मैञीणी दिसताच आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि प्रत्येक जण आपल्या जुन्या सहकार्‍यांच्या गळा भेट घेत उत्साहाने व आस्थेने विचारपूस करू लागला आणि सर्व माहोल दोस्तीमय झाला होता.

संस्थेचे संस्थापक मा.दिलीपसिंह भोसले यांनी फलटण तालुक्यात सदगुरु हरीबुवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कुलच्या माध्यमातून अनेक गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना 30 वर्षापुर्वी शिक्षणाची दारे उघडीकरुन दिली त्यांतीलच 2001 च्या बँचच्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत शिक्षणाची शिदोरी घेतली त्याच ठिकाणी एकञी येवुन शिक्षकासह स्नेहमेळाव्यात सहभागी होत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या मध्ये कोण निमशासकीय, मोठ्या कंपनीत अधिकारी,कोण बँकेत, कोणचा स्वतः चा व्यवसाय तर कोण कन्स्ट्रक्शन व्यवसायात कोणी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात असे एक ना अनेक कामातून सर्वांना उत्तम प्रकारे स्थैर्य लाभलेले दिसले या मुळे आपले शाळेतील ते दिवस आठवले व लहापण देगा देवा असे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येत होते.यावेळी शिक्षिका सौ.स्वाती फुलेमँडम, प्रमोद चव्हाण,प्रदीप चव्हाण अमोल जाधव , सारीका वसव , मनीषा नलवडे , गौरी शिंदे, धनंजय जमदाडे,युवराज पवार , मोहसिन काझी,सागर पवार ,उमेश घोलप , पंकज महामुनी, श्रीनाथ नलवडे, अमोल भोसले , प्रदीप मारुडा,योगेश काळे ,रमेश यमपुरे , शिवदत्त यादव,विशाल मठपती, कबीर मुलाणी उपस्थित होते.