इतर मागासवर्गीय महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन


स्थैर्य, पुणे: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी भैातिक 23 व आर्थिक 131.50 लाख उद्दीष्टे प्राप्त झाले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रुपये 10 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा तसेच रुपये 10 ते 50 लाखापर्यंत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. सदर दोन्ही योजना बँकेमार्फत राबविली जाईल. कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार ( जास्तीत जास्त 12 % पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल. वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थींची ( इतर मागासवर्गीय) कौटूंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रूपये आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय 18 ते 50 पर्यंत, कर्ज खाते,आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य असणार आहे. महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य असून उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी.महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी, स.नं. 104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी,येरवडा,पुणे - 411006 फोन नं.020-29703059 येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.