चिकन सेंटरवरील कारवाई दरम्यान आली कोर्टाची स्टे ऑर्डर


जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला कोलदांडा; अतिक्रमणं विभाग राजकारणाच्या दाढेला


स्थैर्य, सातारा : सातारा चिकन सेंटर या दुकानाच्या पत्र्यांचे अतिक्रमण काढल्यावर दुकान मालकाने कोर्टाची स्टे ऑर्डर आणल्याने पालिकेला सोमवारी अतिक्रमण हटाव कारवाई गुंडाळावी लागली .सलग दुसर्‍या खेपेला अतिक्रमण हटाव विभागाला प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माघारी फिरावी लागले.

दबावाच्या राजकारणामुळे शहर विकास विभागाचे पुरते हसे झाले . पोवई नाका ते राधिका रोड यांना जोडणार्‍या साठ फुटी रस्त्याचा डीपी मंजूर असताना त्यामध्ये सातारा चिकन सेंटर या दुकानाचे मोठे पकक्या बांधकामाचे अतिक्रमणं आहे . जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे अतिक्रमण हटवण्याच्या स्पष्ट सूचना असताना केवळ पालिका प्रशासनाने राजकीय दबावापुढे मानं तुकवत वेळकाढूपणा केला .दुकान मालक चांद गनी आत्तार यांनी अतिक्रमण स्वतःहून काढण्यासाठी सोमवारची वेळ मागून घेतली होती . मात्र त्यांनी मुदतीत काहीच हालचाल न केल्याने अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी आपल्या यंत्रणेसह सकाळी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली.

दुकानाच्या पिछाडीकडून पथकाने तब्बल एकोण तीस पत्रे हटवून चेनलिंकची जाळी तोडून काढली . दरम्यान भाग निरीक्षकांनी आत्तार यांनी कोर्टाची स्टे ऑर्डर घेतल्याचा निरोप दिल्याने अतिक्रमण विभागाच्या मेहनती वर पाणी फिरले .

No comments

Powered by Blogger.