फलटण चँपियन सिंगल खुल्या कॅरम स्पर्धेत सागर जाधव विजेता

स्थैर्य, फलटण : सागर जाधव यांना पारितोषिक वितरण करताना डॉ.संजय राऊत. समवेत रफिकभाई मेटकरी, रणजीत पवार.

स्थैर्य, फलटण : येथील उमाजी नाईक चौक येथील कॅरम हाऊसमध्ये कै.रंगुबाई कृष्णाजी राऊत यांचे स्मरणार्थ आयोजित सिंगल खुल्या कॅरम स्पर्धेत सागर जाधव यांनी बाजी मारली. सदर स्पर्धेत कय्यूम कुरेशी उपविजेते ठरले तर तृतीय क्रमांक गणेश तारे व चतुर्थ क्रमांक जावेद पठाण यांनी पटकावला. विजेत्यांना प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संजय राऊत यांच्या हस्ते रोख बक्षीस व पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी रफिकभाई मेटकरी, रणजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
यावेळी बोलताना डॉ.संजय राऊत म्हणाले, कॅरम खेळताना एक प्रकारचे ध्यान होते व यामुळे मनावरील ताणतणाव कमी होतो. प्रत्येकाने स्वत:च्या मानसिक व शारिरीक स्वास्थ्यासाठी कोणता ना कोरता खेळ आवश्य खेळायला हवा.
 
यावेळी हेमंत भोई यांना एका महिन्यात दोन वेळा ब्रेक टू फिनीश केलेबद्दल विशेष पारितोषिक म्हणून एक कॅरम स्ट्रायकर देण्यात आला.

No comments

Powered by Blogger.