Your Own Digital Platform

पवारांवर विश्वास नाही: आमदार बच्चू कडू


स्थैर्य, मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम असून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आलं तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य भूमिका असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधत दोन्ही बाजू सांभाळण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने पार पाडली आहे. मात्र शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवारांवर विश्वास नाही असं वक्तव्य प्रहार जनशक्तीचे एकमेव आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
 
बच्चू कडू यांनी शिवेसनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.बच्चू कडू यांनी सांगितले की, शपथविधी होत नाही तोपर्यंत पवार काय करतील सांगू शकत नाही असं सांगत भीती व्यक्त केली आहे. तसंच शरद पवार काय करतील हे अजित पवारांना नाही कळलं तर मला काय कळणार असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी माझी राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा नव्हती असंही स्पष्ट केले.