गोखळी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी रघुनाथ ढोबळे बिनविरोध


स्थैर्य, गोखळी : गोखळी ता फलटण येथील गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या व्हाईस चेअरमनपदी रघुनाथ कृष्णा ढोबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत खटके होते. रघुनाथ ढोबळे राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असुन यापुर्वी त्यांनी खटकेवस्ती ग्रामपंचायतचे सरपंच , जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य , राष्ट्रवादी बी सी ओबीसी सेल चे विभागीय उपाध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे.
 
या निवडीप्रसंगी चेअरमन तानाजी गावडे , मावळते व्हा चेअरमन पोपटराव गावडे , पत्रकार राजेंद्र भागवत आबासाहेब मदने पप्पू खटके वैभव खटके , अविनाश कुमठेकर , मुन्ना शेख अमोल हरिहर आणी होणार समाज संघटनेचे पदाधिकारी आदींसह.ग्रामस्थ उपस्थित होते . 

या निवडीबद्दल त्यांचे विधानपरिषद अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदींसह ग्रामस्थांमधुन अभिनंदन होत आहे.

No comments

Powered by Blogger.