भारत पेट्रोलियम आणि एअर इंडिया विकणारस्थैर्य, नवी दिल्ली: एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार असून या कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्यामुळे हे पाऊल उचलेले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून सरकारला एक लाख कोटींचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी ही माहिती दिली.
 
याच महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना खुले पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, कंपनीचे विभाजन कंपनीला अधिक सक्षम बनवेल. गेल्या वर्षी सरकारने विमान कंपनीतून 76 टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. मात्र, कोणीही कंपनी विकत घ्यायला तयार नव्हते. सध्या सरकारकडे एअर इंडियाचे 100 टक्के समभाग आहेत. 

भारत पेट्रोलिअम कॉर्पोरशन लिमिटेडने (बीपीसीएल) सचिवांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये सरकारची पूर्ण 53.29 टक्के हिस्सा विक्रीसाठी सहमती व्यक्त केली होती. बीपीसीएलचा बाजार भांडवल सुमारे 1.02 लाख कोटी रुपये आहे. याची 53 टक्के हिश्याच्या विक्रीसह 65,000 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल अशी सरकारला आशा आहे.

No comments

Powered by Blogger.