Your Own Digital Platform

माणदेशी महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन


समाजाला दिशा देण्याचे काम माणदेशी फौंडेशन करीत आहे : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल
स्थैर्य, सातारा: माण देशी फौंडेशनच्या वतीने सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या माणदेशी महोत्सव 2019 चे उद्घाटन सोहळा आज दि 21 नोव्हेंबर 2019 रोजी सातारा जिल्हाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिघंल मॅडम यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन संपन्न झाला.
 
या प्रसंगी या कार्यक्रमास सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, इनव्हेस्ट इंडियाचे प्रकाश मिश्रा, सातारा जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील, माणदेशी फौंडेशनच्या मॅनेजिंग ट्र्स्टी श्रीमती रेखा कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती वनिता शिंदे हे उपस्थित होते.
 
यावेळी कन्या विद्यालय करंजे पेठ येथील मुलींचे लेझीम पथक आणि पांगरी येथील मुलांच्या गजी नृत्याच्या सादरीकरणाने या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
 
माणदेशी महोत्सवाचे हे 6 वे वर्ष आहे यावर्षी या महोत्सवाचे खास आकर्षण आहे ते लघू उद्योजकांसाठी लागणा-या मशीनरींचे प्रदर्शन आणि विक्री ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायीक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते माणदेशी महोत्सव 25 नोव्हेंबर 2019 अखेर सुरु राहणार आहे.
 
या वेळी माणदेशी फौंडेशनच्या श्रीमती चेतना सिन्हा यांनी सर्व साताराकरांना आवाहन करताना म्हणाल्या माणदेशी महोत्सवास भेट देऊन ग्रामीण महिलांनी तयार केलेल्ता वस्तूंचे खरेदी करावी.
 
सोमवार पर्यंत चालणार्‍या या महोत्सवामध्ये माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती, खलबत्ते, केरसुणी, दुरड्या, सुपल्या त्याचबरोबर माणदेशी गावरान ज्वारी,बाजरी, देशी , मटकी, मूग, सेंद्रीय हळद, बेडगी मिरची पावडर त्याचबरोबर महिलांसाठी खास इरकली साड्यांचे प्रदर्शन आणि विक्री असे विविध प्रकारचे 180 हून अधिक स्टॉल सातारकरांना पाहता येतील.