Your Own Digital Platform

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकही अर्ज दाखल नाही


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील तीन सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि नऊ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

फलटण तालुक्यातील मुदत संपलेल्या माझेरी ,गोळेवाडी, परहर खुर्द या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम मुदत संपल्याने जाहीर झालेला आहे या तिन्ही ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 21 असल्याने त्या दिवशीच या ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे या ग्रामपंचायती बरोबरच रिक्त झालेल्या काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आले आहे यामध्ये बोडकेवाडी परहर बुद्रुक होळ, मुळीकवाडी, अलगुडेवाडी जाधववाडी (फलटण )झडकबाईचीवाडी, ढवळेवाडी(आसू) पाडेगाव या 9 ग्रामपंचायतीच्या तेरा रिक्त पदासाठी निवडणुका होत आहेत या ग्रामपंचायतीसाठी अद्याप अर्ज दाखल झालेले नाहीत.