Your Own Digital Platform

अजिंक्यतारा कारखाना उच्चतम दर देणार : वेदांतिकाराजे


स्थैर्य, सातारा : सहकारी साखर कारखानदारीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्याने नेहमीच सभासद शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून नियोजनबध्द कामकाज केले आहे. अनेक अडचणींवर मात करुन कारखाना आज आर्थिकदृष्टया पुर्णपणे सक्षम असून कारखान्याची घोडदौड जोमाने सुरु आहे. ऊस पुरवठादार सभासद शेतकर्‍यांनी कारखान्याला गाळपासाठी पाठवलेल्या ऊसाला उच्चतम दर देण्यात कारखाना नेहमीच अग्रेसर राहिला असून याही गळीत हंगामात येणार्या ऊसाला किफायतशीर दर देण्याची परंपरा कारखाना अखंडीत ठेवेल, असा विश्वास श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे मानांकन प्राप्त असलेला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 36 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ सभासद गुलाबराव किर्दत, सौ.नंदा किर्दत (करंजे), दिनकर साबळे, सौ.लिलावती साबळे (शिवथर), हणमंत कणसे, सौ.शालन कणसे (अंगापूर-वंदन) श्रीरंग निकम, सौ.सिंधुताई निकम (अपशिंगे), मधुकर पवार, सौ.शारदा पवार (निगडी), संपत शिंदे, सौ.पार्वती शिंदे (पाडळी), संपत श्रधनवडे, सौ.सुमन धनवडे (शिवाजीनगर) या उभयतांच्या हस्ते व श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कारखाना कार्यस्थळावर उत्साहात संपन्न झाला. यावेळी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ही परंपरा कारखान्याने कायम ठेवली. ही अभिमानाची बाब आहे. कमी ऊसाच्या उपलब्धतेमुळे यंदाचा गळीत हंगाम हा जिकरीचा असून कारखान्याने ठरविलेले 5.00 लाख मे.टन उद्दिष्ट यशस्वीपणे पुर्ण होणेसाठी कारखान्याने आवश्यक ते नियोजन केले आहे. आवश्यक तेवढी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करारबध्द करून हजर झालेली आहे. एकंदरीत हा हंगाम कमी दिवसाचा राहणार असल्यामुळे कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्याने तसे नियोजन केले आहे. हंगामासाठी ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे गाळपासाठी नोंदविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लागवड वाढविण्यास मोठा वाव आहे. तेव्हा लागवडीचे क्षेत्रामध्ये वाढ होणेसाठी प्रत्येक ऊस उत्पादकांनी तसे नियोजन करून पुढील वर्षी आपल्या कारखान्यास जास्तीत जास्त गाळपास ऊस कसा उपलब्ध होईल यासाठी आवश्यकते प्रयत्न करावेत. अजिंक्यतारा कारखाना ही मातृसंस्था असून ती चांगली चालणेसाठी आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले असून असेच सहकार्य यापुढेही वृध्दींगत व्हावे, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.

स्व.भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने व सहकार्याने चालु केलेल्या या कारखान्याचे मोठया वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज जिल्हयातच नव्हे तर राज्यात एक सक्षम सहकारी संस्था म्हणून ओळखली जात आहे. गेल्या 10 ते 12 वर्षात अजिंक्यतारा कारखान्याने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला असून सभासद, बिगर सभासद, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूक कंत्राटदार या सर्वांचीच विश्वासर्हता वाढवली आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने व सक्षमतेने चालविला जात असल्यामुळे ऊसाला वेळेत आणि एङ्गआरपी प्रमाणे दर दिला जात आहे. आपणा सर्वांची मोलाची साथ असल्यामुळेच कारखान्याची घोडदौड जोमाने सुरू आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नामदेव सांवत यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी कार्यक‘माचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे कार्यक‘म यशस्वीपणे संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सदस्य तसेच जि.प. सदस्य शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, मार्केट कमिटी अध्यक्ष विक‘म पवार, माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, सदस्य-पोपटराव धनवडे, पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य दयानंद उघडे, राहूल शिंदे, माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, दादा शेळके, तालुका खरेदी विक‘ाी संघाचे गणपतराव शिंदे, चेअरमन शिवाजीराव सावंत, व्हा.चेअरमन नारायणराव साळुंखे, संचालक सुनिल काटे, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष धनाजी शेडगे, जिल्हा खरेदी विक‘ाी संघ अध्यक्ष ऍड.सुर्यकांत धनावडे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ङ्गडतरे, सातारा जिल्हा बँक संचालिका सौ.कांचन साळुंखे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष बळीराम देशमुख, माजी चेअरमन पंडीतराव सांवत, माजी उपाध्मक्ष गणपतराव मोहिते, अजिंक्यतारा ङ्गळे ङ्गुले संचालक पदमसिंह ङ्गडतरे, पांडूरंग पोतेकर, कारखान्याचे सर्व माजी संचालक सदस्य, अजिंक्यतारा उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी अधिकारी, युनियन अध्यक्ष धनवे, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळ सचिव सयाजी कदम, अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस-उत्पादक-शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठया सं‘येने उपस्थित होते.