Your Own Digital Platform

सुशीलकुमार शिंदे कासवर


स्थैर्य, सातारा: काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जागतिक वारसास्थळ असलेल्या ’कास’ला आपल्या मित्र परिवारासह सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी या परिसरातील यवतेश्वर परिसर, कास परिसरात फेरफटका मारत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कास पुष्प पठार हा इतका निसर्गरम्य आहे, असे वाटले नव्हते. मी पहिल्यांदाच कसला आलो आहे. सातारा आणि महाबळेश्वर ही दोन शहरे निसर्गाची देण आहेत. राजकीय, पूर्वकालीन परिस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातार्यात राहतात. त्यामुळे या शहराला वेगळे महत्व आहे. कास परिसराच्या दोन्ही बाजूला धरणे आहेत. असे विहंगम दृश्य कोठेही पहावयास मिळणे अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.