Your Own Digital Platform

शहरात विनापरवाना खोदकाम; गुन्हा दाखल करण्याची मागणी

स्थैर्य, फलटण : खाजगी मोबाईल कंपनीने केलेले खोदकाम.

स्थैर्य, फलटण : येथील जुनी स्टेट बँक कॉलनी रिंगरोड लगत एका खासगी मोबाइल कंपनीने केबल टाकण्यासाठी विनापरवानगी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम केले असल्याची बाब समोर येत आहे. या रिंगरोड लगत असणार्‍या रोडवर विनापरवानगी खुदाई वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशापद्धतीने खोदकाम करण्यात आले होते. या विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी जबाबदार कंपनी, कंत्राटदार व अभियंत्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरीकानी केली आहे.

शहरात दरवर्षी मोबाइल कंपन्यांकडून ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात येते. या खोदाईला परवानगी देताना नगर परिषद यांच्याकडून शुल्कही आकारण्यात येते. फलटण नगर परिषद हद्दीत खोदाई करताना मोबाइल कंपन्यांकडून प्रति रनिंग मीटर नुसार शुल्क आकारण्यात येते. कंपनीकडून अनामत रक्क्म घेवून खुदाईची परवानगी दिली जाते. परंतु जुनी स्टेट बँक कॉलनी रिंगरोड लगत शनिवार दि 23 रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी करण्यात आलेल्या खोदकामास नगर परिषदेने खोदकामाची परवानगी दिले नसल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे. खोदकामाची कोणतीही रितसर शासकीय परवानगी नसताना मनमानीपणे फलटण शहरात खुदाई करण्याचे काम सुरू आहे, तसेच याबाबत वाहतूक शाखा व संबंधित विभागालाही या खोदकामाबाबत पूर्वकल्पना दिली नसल्याची माहिती मिळत आहे. गेली दोन ते तीन महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आली आहे. यापैकी अनेक कामांसाठी परवानगी घेण्यात आलेली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

खुदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले खड्डे पुन्हा रस्त्याच्या लेव्हलने ते डांबरीकरण किंवा क्रॉकीटने बुजवीण्याच्या अटी शर्ती नूसार परवानी दिली जाते. तसेच कंपनीने अटी शर्ती देखील मान्य करून कामाला सुरवात केली जाते. मात्र प्रत्यक्षात कंपनीच्या ठेकेदारांकडून शहरात अटी शर्तीकडे दूर्लक्ष करून विनापरवानगी रस्त्यालगत खड्डे खोदले गेले व ते व्यवस्थित न बुजवीता तसेच सोडून दिले आहेत. याकामांबाबत परवानगी आहे किंवा नाही, मुदत संपली असताना खोदकाम कसे करण्यात आले, परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले का याची चौकशी कोण करणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अनेक वेळा खड्डे काढून करून तेथील खड्डे बुजविण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. वाहनचालकांचा नाहक जीव जातो.
 
सध्या शहरात विनापरवानगी खुदाई केल्याने नगर परिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विना परवाना खोदाई करणे, नगर परिषदेचा शुल्क बुडवल्या प्रकरणात नगर परिषदेने विना परवाना खोदलेल्या जागांची पाहणी करून त्याचा अहवाल करून याबाबत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी जबाबदार कंपनी, कंत्राटदार व अभियंत्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरीक करीत आहे.