Your Own Digital Platform

वाठार स्टेशन येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

स्थैर्य, वाठार स्टेशन : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवसैनिक. 
स्थैर्य, वाठार स्टेशन : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवसैनिक.
स्थैर्य, वाठार स्टेशन : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आज वाठार स्टेशन येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रतिमेस हार शिवसैनिकांनी अभिवादन केले.
 
यावेळी शिवसैनिकांनी आपापल्या पक्षाप्रतीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ओल्या दुष्काळी परिस्थितीतुन लवकरात लवकर बळीराज्याला सावरून बळ दे अशी मागणी शिवसैनिकांनी ईश्वरचरणी केली.
या स्मृतिदिनानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वाठार स्टेशन येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष व फलटण - कोरेगाव सहसंपर्कप्रमुख संभाजीराव जगताप, वाठार स्टेशनचे सरपंच ऋषीभैय्या जाधव, ज्येष्ठ शिवसेना नेते उत्तमराव नलवडे, राजेश पवार, महेंद्र जगताप, विशाल जाधव,शामराव चव्हाण, विशेष कार्यकारी अधिकारी विनोद दोरके, दयानंद पाटोळे, शुभम शिरतोडे, प्रसाद पवार आदी शिवसैनिक व वाठार स्टेशन ग्रामस्थ उपस्थित होते.