Your Own Digital Platform

आई प्रतिष्ठानचे उपक्रम कौतुकास्पद: संजीवराजेस्थैर्य, फलटण : आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ वाठार निंबाळकर या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक अतिशय नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य शिक्षक करत असतात .अशा शिक्षकांचा गौरव करण्याचे काम आई प्रतिष्ठान करत आहे. तसेच, निबंध स्पर्धतून विदयार्थांना नव विचाराना चालना देण्याचे कार्य प्रतिष्ठान मार्फत होत आहे, रक्तदान शिबीर , वृद्धाश्रम भेटी, इ. उपक्रम कौतुकास्पद आहेत. गणेश तांबे गुरुजी व सर्व पदाधिकारी यांना चांगल्या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन श्रीमंत संजीवराजे यांनी दिले.
 
आई सन्मान पुरस्काराने पुढील पुरस्कार्थी यांना गौरविण्यात आले. धनाजी कांतागळे, चंद्रकांत चव्हाण ,रमजान इनामदार ,योगिता मापारी ,नामदेव शेंडे, शिवाजी निकम ,विजयकुमार काळे, रत्नाकर थोपटे ,कविता नेवसे,संतोष चव्हाण ,धन्यकुमार तारळकर ,अंजना जगताप ,गणेश पोमणे ,अरविंद निकाळजे, बिभीषण धोत्रे, छाया जगताप ,रामचंद्र बागल, सूनील मदने , रुपल पाटोळे , मंजूश्री शिंदे,संतोष माने, अ‍ॅड,बापूसाहेब सरक ,डॉ. नेताजी निंबाळकर इत्यादींचा गौरव करण्यात आला तसेच इ. पहिली ते दहावीतील विदयार्थांचे निबंध स्पर्धेतील यशाबद्दल सन्मानपत्र व सन्मान चिन्ह , इ. बक्षीस वितरण करण्यात आले. रक्तदान करणारे रक्तदाते यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मा.श्रीमंत .संजीवराजे ना.निंबाळकर अध्यक्ष जि.प. सातारा, मा.श्री मनोज जाधव ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा ,दत्ता अनपट जि.प. सदस्य, परशूराम फरांदे, भानूदास सरक, शोभाताई ना. निंबाळकर, शारदा भोईटे , अनिता तरटे, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे ,श्री.मठपती साहेब, केंद्रप्रमुख गजानन शिंदे, डॉ.रविंद्र बिचुकले, प्रा.प्रभाकर पवार,भगवंतराव कदम ,दत्तात्रय पवार, विकास खांडेकर ,राजेश बोराटे, गणपत बनसोडे, चंद्रकांत मोरे, विजय बनसोडे, महादेव दडस इ.अनेक मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश तांबे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रसिद्ध वक्ते नवनाथ कोलवडकर यांनी केले .