जलमंदिर ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्षपदी शामराव बोराटे; उपाध्यक्षपदी धोंडीराम शिपटे यांची एकमताने निवड


स्थैर्य, फलटण : फलटण येथील जलमंदिर ज्येष्ठ नागरीक संघाची नुकतीच बैठक होवून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी शामराव बोराटे, उपाध्यक्षपदी धोंडीराम शिपटे (गुरुजी) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

जलमंदिर ज्येष्ठ नागरीक संघाच्या सचिवपदी संभाजी कुंभार, कोषाध्यक्ष चंद्रकांत साळवेकर यांची एकमताने निवड करण्यात आली असून कृष्णराव नलवडे, दादासाहेब माने, हिरालाल गांधी, सुभाषराव देशपांडे, राजेंद्र यादव, सौ. सुभद्रा आळंदे, श्रीमती रंजना रणवरे हे सदस्य म्हणून तर सल्लागार म्हणून प्राचार्य रविंद्र येवले, अरुण भोईटे, रुपनवर, काकडे हे काम पाहणार आहेत.

शामराव बोराटे हे फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये 34 वर्षे कार्यरत होते. 2 वर्षे उपप्राचार्य व 5 वर्षे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. धोंडीराम शिपटे (गुरुजी) हे डिस्कळ ता. खटाव गावचे मुळ रहिवाशी असून त्यांनी फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 36 वर्षे सेवा बजावली असून त्यापैकी 5 वर्षे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. 

ज्येष्ठ नागरीक संघाच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकारी निवडीबाबत संत सावता महाराज ट्रस्टचे विजयराव बोरावके, श्रीमंत जलमंदिर ट्रस्टचे नाना नलवडे, क्रांतीज्योती योगा प्राणायाम क्लबचे पदाधिकारी, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष स. य. खरात, सन्माननीय अध्यक्ष नाना खानविलकर, फेस्कॉमचे सदस्य आनंदराव शिंदे, जलमंदिर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह डिस्कळ ता. खटाव येथील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments

Powered by Blogger.