Your Own Digital Platform

विद्यार्थ्याना हे शोभत नाही


बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विषयाच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात खान ह्यांची assistant professor म्हणून केलेल्या नियुक्ती विरोधात मोठ आंदोलन छेडल .ह्याच बनारस हिंदू विद्यापीठाची परंपरा फार मोठी आहे . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्या विद्यापीठाचा मोठा वाटा होता .ब्रिटिशांच्या विरोधात त्यांच्या केलेल्या कारवाया अमाप होत्या . अश्या विद्यापीठाच्या मुलांनी असल जातीयवादी आंदोलन कराव हे योग्य वाटत नाही.

नोव्हेंबर 6 पासून हे आंदोलन सुरु झाल .फिरोजखान हे गृहस्थ धर्मानी मुसलमान असल्या कारणांनी त्यांच्या जागी कोणीतरी हिंदू प्रोफेसर आणून बसवावा अश त्यांची मागणी आहे.

फिरोजखान ना संस्कृत विषयात खालील प्रमाणे पदव्या प्राप्त केल्या आहेत . त्याचं हे अकॅडेमिक रेकॉर्ड गगनचुंबी आहे ह्यात वाद नाही .हे प्राप्त करण्या साठी त्यांना नक्कीच अतोनात मेहनत घ्यावी लागली असणार ह्यात शंका नाही.

त्यांनी B .­ ,B Ed ,करून नंतर त्यांनी M A केल आणि नंतर P .hd पूर्ण केली ( जयपूरच्या राष्ट्रीय संस्कृत मधून P.hd केल ) त्या जागे साठी आलेल्या इतर सर्व लोका पेक्षा खान ह्यांची qualificattions जास्त चांगली होती म्हणून त्यांची नेमणूक केली गेली .संस्कृत भाषेचे ते जाडे पंडित आहेत .अशा माणसाच्या केवळ धर्मावरून विरोध करून स्वत: ची बौद्धिक उंची मुलांनी दाखून दिली.

कोणतीही भाषा ही कोण एका विशिष्ठ धर्माची अगर जातीची असूच शकत नाही .उद्या जर गोरे लोक म्हणाले इंग्लिश भाष्या हि गोरे लोकांची भाष्या आहे . तुम्ही ती कोणाला शिकवायची नाही तर आपल कसं होईल.

माझ्या माहितीत अनेक हिंदू अस्खलित उर्दू भाष्या बोलतात ,एव्हढेच नाही तर अनेक युनिव्हर्सिटी मध्ये शिकवण्याच काम पण करतात . हिब्रू ही गशु लोकांची भाषा .इतर धर्माच्या लोकांनी हि भाष्या शिकावी म्हणून अनेक विद्यापीठात त्यांनी ीलेश्रशीीहळिी ठेवल्या आहेत .भा.ज.पा शासन आल्या पासून असल्या बुरसटलेल्या विचारांनी काहूर माजवला आहे .मला असं वाटत कि वरच्या लोकांना दाखविण्यासाठी केलेली हि कसरत आहे .पण त्यांनी आपल्या देशाला कित्येक ठिकाणी खाली मान घालावी लागते त्याची खंत कोणाला ही नाही.

हे सुरु झाल्या नंतर फिरोझखान एकदम नाहीसे झाले , अदृश्य झाले .विद्यार्त्यानी र्ींळलश लहरपलशश्रेी च्या घर बोह्ती एक अग्नी कुंड केलं

फिरोजखान ह्यांना मुलांना आज नाहीतर उद्या अक्कल येईल अशी आशा वाटते .ते म्हणाले माझं संस्कृत वर प्रेम आहे . मी आठ वर्ष्यांचा असल्या पासून संसृत शिकत होतो .आमच्या गावात 30 % समाज मुसलमान आहे तरी देखील आमच्या गावात मला संस्कुत शिकू नकोस असं कोणी मला सांगितल नाही . मला कुरणा पेक्षा संस्कृत जास्त येत .हे सगळ असून सुधा केवळ मी एक मुसलमान आहे म्हणून मला विरोध करायचा हे मला योग्य वाटत नाही .भाष्या कोणा एका धर्माची ,जातीची ,पंथाची असूच शकत नाही . असं खान म्हणतात .शासनांनी त्या मुलांना त्यांची जागा दाखून दिली पाहिजे हे नक्की.

- रंगा दाते लक्ष्मिनगर , फलटण .
415523 मो.9850802121