Your Own Digital Platform

शिखरशिंगणापूरचे प्रवेशद्वार भग्नावस्थेत

स्थैर्य, शिंगणापूर : ऐतिहासिक दगडी प्रवेशद्वाराची दूरवस्था झाली आहे.

ऐतिहासिक दगडी प्रवेशद्वाराचे शिल्लक अवशेष जतन करण्याची मागणी

स्थैर्य, शिंगणापूर : इ स वी सन 1280 सालचा ऐतिहासिक वारसा सांगणारे शिखरशिंगणापूर आहे यादवकालीन व छत्रपतींचा वारसा सांगणार्‍या अनेक बाबी इथं आहेत त्यापैकी पुर्वेचे मुख्यदगडी प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे त्याची डागडुजी करून ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे शिल्लक अवशेष जतन करण्याची मागणी शिंगणापूर ग्रामस्थ व माणुसकी प्रतिष्टान करीत आहे ते त्वरित न झाल्यास अपघाताची भीती अनेक जण व्यक्त करताहेत

शिंगणापूर मध्ये जवळपास पाच दगडी प्रवेशद्वारे आहेत हजारोवर्षं झाली ऊन पाऊस झेलत उभी आहेत मात्र ग्रामपंचायत प्रशासना स ह कोणाचं ही याकडे लक्ष नाही.शिखर शिंगणापूर या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या मुळे प्रशासनाने व पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे शिवकालीन वस्तु व शिवकालीन कला जतन करणे आवश्यक आहे सध्या पाच ही प्रवेशद्वाराची डागडुजी व देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा या वास्तुं ची पडझड व नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे तर गावचे भूषण असणारे प्रमुख दगडी पूर्वप्रवेशद्वार ढासळले असून त्याची चांगलईच पडझड झालेली आहे
 
शिंगणापूर ग्रामपंचायत,व पुरातत्वाखाते,जिल्हाप्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा याठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करताहेत या दगडी प्रवेशद्वारतुन लहान मुले,मुकी जनावरे, भाविक भक्त यात्रेकरू प्रवासी ये जा करीत असतात वर्दळीच्या याठिकाणी एखादा घडीव दगड पडल्यास ..जायबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या साठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पूर्व दगडीप्रवेश द्वाराची दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांची मागणी आहे.