शेतकर्यांना मदत द्या
तहसीलदार आशा होळकर यांना शिवसेनेचे निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकर्यांना खरीप हंगामासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर सरसकट कोणतेही निकष न लावता आर्थिक मदत करण्यात यावी. पिक विमा काढलेल्या शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ त्वरित देण्यात यावा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे बरेच शेतकर्यांचे अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडे पेंडिंग आहेत. शेतकर्यांची कोणतीही अडवणूक न करता त्यांना सहकार्य करून मदत मिळवून देण्यासाठी कृषी अधिकारी यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेना सातारा तालुका प्रमुख दत्तात्रय नलावडे, ज्येष्ठ नेते हैबत बापू नलावडे, रमेश बोराटे, दिलीप वाघमळे, मनोज नलावडे, सचिन जगताप, रवींद्र शेळके, अजित नलावडे, ज्ञानेश्वर नलावडे, संजय गायकवाड, गणेश नलावडे, निलेश रसाळ, संदीप नलावडे, सचिन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते
Post a Comment