Your Own Digital Platform

जात वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याचे आवाहन


स्थैर्य, सातारा : जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिनांक 30-7-2011 ते 31-8-2012 या कालावधीत निर्गमित करण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याचे निर्देश असून या कालावधीत तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांच्याकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र फेर पडताळणीसाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा कार्यालयाशी दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य रविंद्र कदम यांनी केले आहे. कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा- (फोन नं. 02162-298107)