Your Own Digital Platform

प्रगतिशील ‘बुकर’


फंडामेंटल
ख्यातनाम लेखक आणि त्यांच्या कादंबर्‍यांना मागे टाकत दोन महिलांनी यंदाचा प्रतिष्ठित‘बुकर’पटकावलाय
2019 चे बुकर पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. मार्गारेट एटवूड आणि बर्नरडाइन एवरिस्टो यांना संयुक्तरीत्या या पुरस्कारानं यंदा सन्मानित करण्यात आलं. खरं तर यात नवीन असं काहीच नाही. कारण बुकर पुरस्कारांची दरवर्षी घोषणा होते. पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र यंदाच्या ‘बुकर’चं काही खास वैशिष्ट्य होतं. या पुरस्कारासाठी मार्गारेट आणि एव्हरिस्टो यांची संयुक्तपणे निवड करण्यात आली. त्याचप्रमाणं अरबी भाषेतील कादंबरीकार जोखा अल्हार्थी यांनाही बुकरनं सन्मानित करत बुकरनं प्रगत पाऊल उचललं आहे. संयुक्त पुरस्कारासाठी निवड झालेल्या दोघींपैकी एव्हरिस्टो या हा पुरस्कार मिळवणार्‍या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि पहिल्या ब्रिटिश लेखिका ठरल्या आहेत. तर दोनदा बुकर मिळवणार्‍या मार्गारेट या हा पुरस्कार मिळवणार्‍या सर्वात ज्येष्ठ लेखिका ठरल्या आहेत. मार्गारेट यांना यापूर्वी 2000 मध्ये त्यांच्या, ढहश इश्रळपव Aीीरीळप साठीही या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मार्गारेट यांची, ढहश करपवारळव’ी ढरश्रश या कादंबरीची आणि एव्हरिस्टो यांची, ॠळीश्र, थेाशप, जींहशी या कादंबरीची बुकरसाठी निवड करण्यात आली. जोखा अल्हार्थी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा पद्धतीचा पुरस्कार मिळवणार्‍या पहिल्या अरब भाषिक लेखिका ठरल्या आहेत. जोखा यांच्या, ‘कॅलेस्टियल बॉडीज’साठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मूळ अरबी भाषेतील जोखा यांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कारांची सुरुवात 1969 मध्ये करण्यात आली होती. 1992 मध्ये पहिल्यांदा दोन लेखकांना संयुक्तरूपानं या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुरस्काराच्या नियमावलीत बदल करण्यात येऊन पुरस्कार एकालाच प्रदान करण्याची प्रथा सुरू झाली. मात्र यंदा परीक्षकांनी नियम बाजूला सारून मार्गारेट आणि एव्हरिस्टोच्या गुणवत्तेचा सन्मान केला आहे.