Your Own Digital Platform

सातार्‍यात केंद्रीय विद्यालय स्थापन कराखासदार श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत मागणी

स्थैर्य, नवी दिल्ली: कालपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोसभेत एक मुद्दा मांडला. 

महाराष्ट्रातले खासदार, विशेषतः शिवसेनेचे खासदार शेतकर्‍यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत असताना श्रीनिवास पाटीलही याच मुद्यावर बोलायला उभे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. 

पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं. अनेक दिवसांनंतर तुम्हाला ऐकण्याची संधी या सभागृहाला मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील याचं स्वागत केलं. पाटील यांनी मग पीठासीन अधिकार्‍यांचे आभार मानले आणि म्हणाले की सातारा जिल्ह्यात एकही केंद्रीय विद्यालय नसल्यामुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय विद्यालय स्थापन केले जावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज सोमवारी लोकसभेत शून्य प्रहरात केली.
 
सातारा जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. पण शेतकर्यां च्या मुलांसाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध नाही. या पार्श्वअभूमीवर जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार पाटील म्हणाले.
 
अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावं, ही नम्र विनंती करतो असं म्हणत त्यांनी आपलं लहानसं भाषण संपवलं. 


शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. पाटील हे यापूर्वीही दोनवेळा खासदार राहिले असून सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी विकासाची कामं करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे म्हटले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो, असे पाटील यांनी आपल्या विजयानंतर म्हटले होते. दरम्यान, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात केलेला प्रवेश लोकांना रुचला नाही. तसेच, शरद पवारांची पावसातील सभा सातार्‍यातील निवडणुकीत निर्णायक ठरल्याचंही अनेकांच मत आहे.