Your Own Digital Platform

लवकरात लवकर पर्यायी सरकार देणार: नवाब मलिक


स्थैर्य, पुणे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून लवकरात लवकर एक पर्यायी सरकार देण्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.
 
कोअर कमीटीची बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आम्ही काँग्रेससोबत आघाडी करुन लढलो होतो त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करुन पर्यायी सरकार देण्याबाबत विचारविनिमय झाला. या बैठकीत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांची मुंबईमध्ये बैठक होणार असून यामध्ये चर्चा करुन पुढे काय करायचे आहे याची भूमकिा ठरवली जाणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमटिीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे,राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.