महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास ‘टोलबंद आंदोलन’

स्थैर्य, सातारा : महामार्ग दुरुस्तीबाबत जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत संबंधीत अधिकार्यांची चर्चा करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर.

राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा 15 दिवसांचा अल्टीमेटम 

स्थैर्य, सातारा : महामार्गाची दुरावस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वाणवा यामुळे टोल का भरायचा? टोल बंद करावा, यासाठी आक‘मक झालेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार मंगळवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्गाची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची दुरुस्ती होत नसेल तर टोल का भरायचा असा सवाल करुन आक्रमक भुमिका घेतली. चर्चेअंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी येत्या 15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची दुरुस्ती (कार्पेट) करण्याचा शब्द दिला. 

दरम्यान, 15 दिवसांत महामार्ग, सेवा रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती न झाल्यास 16 व्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला. तसेच तुम्हाला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुनावले.
 
पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. अशी मागणी करत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा 9 नोहेंबर रोजी दिला होता. यावरच न थांबता त्यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग दुरुस्ती आणि आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन तसे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना देण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकार्यांनी संबंधीत सर्व अधिकार्यांची बैठक बोलावून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंगळवारी जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी सातारी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणिस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
 
बैठकीत महमार्गाची आणि सेवा रस्त्यांची दुरावस्था, खड्ड्े यामुळे होणारे अपघात, जीवीत आणि वित्त हानी याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आक‘मक भुमिका मांडतानाच महामार्गावर सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचेही सांगितले. घमासान चर्चेनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्ग, सेवा रस्त्यांवरील खड्डे भरणार आहात का नाही? असा खडा सवाल करुन अधिकार्यांची बोलती बंद केली. तसेच जोपर्यंत काम होत नाही, सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली. यानंतर उपस्थित अधिकार्यांनी येत्या 15 दिवसांत महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे कार्पेट करुन भरले जातील असे सांगितले. मात्र सोयी सुविधांसाठी थोडा वेळ लागेल, असे सांगितले. तुम्ही 15 दिवसांची वेळ घेतली आहे. वेळेत महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरुस्ती करा. खड्डे कार्पेट करुन भरा, पेव्हर ब्लॉक चालणार नाहीत. 15 दिवसांत काम झाले नाही तर, 16 व्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यवेळी दिला.

  20 किलोमीटर परिघातील लोकांना सवलत पास द्या
पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. टोलबंद आंदोलनाबाबत सांगितल्यानंतर त्यांनी आनेवाडी टोल नाका येथून 20 किलोमीटर परिघात येणार्या सर्व गावातील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत. संबंधीत अधिकार्‍यानी या लोकांना सवलत पास द्यावेत. यामध्ये सुध्दा बोगसगिरी चालू असल्याचे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मी स्वत: सवलत मिळणार्या गावांची यादी घेवून ती प्रसारमाध्यमांच्याद्वारे प्रसिध्द करणार असल्याचे जाहिर केले.

No comments

Powered by Blogger.