Your Own Digital Platform

वडजलमध्ये गळा चिरुन खून


स्थैर्य, फलटण : वडजल ते भिलकटी या रस्त्यावर एका बाजरीच्या शेतात 40 वर्षीय पुरुषाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची घटना वडजल (तालुका फलटण) गावच्या हद्दीत घडली आहे खुनाचे कारण समजू शकलेले नाही

वडजल ते भिलकटी रस्त्याच्या कडेला आबा ढेंबरे यांच्या शेताच्या कडेला चारीत अंदाजे चाळीस ते पन्नास वयाचे पुरुष जातीचे प्रेत गळा कापलेल्या अवस्थेत आढळून आले होते सदर मयत व्यक्तीच्या अंगातील शर्ट रक्ताने भरलेला होता तसेच रस्त्याच्या पश्चिम बाजूस रक्त सांडले होते तपासाअंती सदरची मयत व्यक्ती प्रकाश फोरमन पवार रा शिंदेवाडी - साखरवाडी(ता फलटण) असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन सावन्त यांनी दिली
 
सदरचा खून कोणत्या कारणाने झाला यातील आरोपी कोण याची माहिती समजू शकलेली नाही पोलीस तपास करीत आहेत

सदरची घटना सकाळी नऊ पूर्वी घडल्याची फिर्याद पोलीस पाटील विजयकुमार ढेंबरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे