Your Own Digital Platform

दिगंबर गानबोटे यांचे निधन


स्थैर्य, फलटण : येथील नामदेव शिंपी समाजातील ज्येष्ठ नागरीक व कापडविक्री व्यावसायिक दिगंबर बबनराव गानबोटे (वय 66) यांचे दि. 16 नोव्हेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सातार्‍यातील व्यावसायिक भरत दत्तात्रय लंगडे यांचे ते सासरे होत. गानबोटे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.