Your Own Digital Platform

राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन


स्थैर्य, फलटण : राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी आणि स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद प्रा. शाळा परिसर, आसू ता. फलटण येथे करण्यात आले आहे.

स्वदेशी या विषयावर आयोजित निबंध व कविता स्पर्धेतील यशस्वीतांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण आणि राज्यस्तरीय कवी संमेलन होणार आहे.

यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व पंचायत समिती उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, सिने गीतकार हनुमंत चांदगुडे, फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, खातगुणचे सर्वोदयी कार्यकर्ते बाबासाहेब इनामदार, गांधीवादी कार्यकर्ते जीवन इंगळे गुरुजी, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद झांबरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि स्वदेशी बचत गट, सकुंडेमळा, आसू यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आसू व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि प. महाराष्ट्रातून कवी, लेखक उपस्थित असतात.

केवळ वृक्षरोप व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असूनही राज्याच्या विविध भागातून मोठया संख्येने उपस्थित राहणारे कवी/लेखक हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय आहे.