‘श्रीराम-जवाहर’च्या ऊस गळीत हंगामाचा आज शुभारंभ


स्थैर्य, फलटण : श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटण या साखर कारखान्याचा सन 2019 - 20 सालाचा 14 वा व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा 63 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ आज शनिवार दिनांक 23 रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्नहोणार आहे, अशी माहिती श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
 
गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासद तुकाराम खटके (खटकेवस्ती), नारायण साळुंखे (होळ), जगन्नाथ माने (सांगवी), अशोक जाधव (चौधरवाडी), यशवंतराव सूर्यवंशी (शेरेचीवाडी - हिंगणगाव), सुर्याजी माने (हनुमंतवाडी), विश्वास माळवे (राजुरी) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, दत्त इंडिया प्रा.लि. चे संचालक प्रेमजी रुपारेल, प्रिती रुपारेल, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, पंचायत समितीच्या सभापती सौ.प्रतिभा धुमाळ, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन महादेव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवान होळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

सभासद व परिसरातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.