Your Own Digital Platform

माण तहसीलमध्ये रिक्त पदाने कार्यालयीन कामकाज ठप्प


स्थैर्य, माण : माण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांपासून क्लार्क तलाठी पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामावर असलेल्या अधिकारी व कर्मचार्यानावर अतिरिक्त ताण येत आहे.पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांची दैनदिन कामे रखडली जात आहेत. त्यामुळे रिक्त पदाने माण तहसील कार्यालय ‘व्हेंटीलेटर’वर असल्याचे पाहायला मिळत आहे. तरी शासनाने रिक्त असलेली पदे तातडीने भरल्यास रखडलेली कामे सुरळीत होतील व नागरिकांना दिलासा मिळेल यासाठी हि रिक्त पदे तातडीने भरावीत अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
 
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या माण तहसील कार्यालयात सध्या नायब तहसीलदारांची चार पदे आहेत त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार स्वताचा पदभार सांभाळून महसूल नायब तहसिलदार व निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार निवाशी नायब तहसीलदार हे अतिरिक्त काम पाहतात. त्यामुळे चार जनांचे काम दोघांना पहावे लागत आहे.तालुक्यातील तलाठी यांची 42 पदे मंजूर असतांना 30 जण काम पहात आहेत तलाठयांची 12 पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयातील क्लार्कची 16 पदे मंजूर आहेत तर याठिकाणी 8 जण काम पहात आहेत त्यांचीही 8 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे अधिकारी कर्मचारी यांच्यात ताण-तणावाचे वातावरण वाढले आहे.
 
नुकत्याच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांची जबाबदारी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचायांवरच होती त्याचाही अतिरिक्त ताण त्यांच्यावरच पडला होता. तोकडया मनुष्यबळावर या निवडणुका यशस्वी पार पडल्या. या निवडणुकानंतर दैनंदिन कामांबरोबर पंतप्रधान सन्मान विकास योजना, 7/12 संगणकीकरण, पंतप्रधान किसान मानधन योजना, सध्या सुरु असलेली शिक्षक पदवीधर मतदार नोंदणी हा बोजाही त्यांच्यावर पडलेला आहे.
 
विधानसभा निवडणुकीनंतर अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे पंचनामे महसूल विभागालाच करावे लागत आहेत. ही कामे अपुर्या मनुष्यबळावर करण्याचे काम सुरु आहे. सर्व बाबीचे संकलन करणे त्याची आकडेवारी लावून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणे याची जबाबदारी तलाठी व क्लार्क यांच्यावर मोठया प्रमाणात आहे. दैनंदिन कामे व अतिरिक्त कामाच्या बोजाने तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. 

तहसिलदार यांना कामकाज करताना ‘आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे’ म्हणण्याची वाईट वेळ आली आहे, यासाठी शासनाने लक्ष घालून रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत