Your Own Digital Platform

नवे सरन्यायाधीश शरद बोबडे हे मूळचे फलटणच्या बीबीचे?


स्थैर्य, फलटण : सर्वोच्च न्यायालयाचेसर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. शेजारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

सोशल मीडियावर नेटकार्‍यांचा दावा

स्थैर्य, फलटण (प्रसन्न रुद्रभटे) : सर्वोच्च न्यायालयाचेसर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडेंना गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, शरद बोबडेंनी सभागृहात उपस्थित सर्वांना अभिवादन करुन आभार मानले. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसर्‍यांदा मिळाला आहे. शरद बोबडेंच्यारुपाने मराठमोळा माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या ’सर्वोच्च’ स्थानी विराजमान झाला आहे. सदरील बोबडे कुटुंब हे मूळचे बीबी ता. फलटण जि. सातारा येथील असल्याचा दावा नेटकर्यांनी सोशल मीडियावर केला आहे. न्यायमूर्ती बोबडे कुटुंब यांच्या पूर्वीच्या काही पिढ्या नागपूर येथे स्थलांतर झाले असल्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. 

राष्ट्रपती भवनात समारंभात राष्ट्रपतीरामनाथ कोविंदयांनी न्या. बोबडेंना सत्य आणि गोपनियतेची शपथ दिली. सन 2013 मध्येसर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची 65 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची 18 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींची उपस्थिती या सोहळ्यात लक्षणीय ठरली. बोबडेंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.