Your Own Digital Platform

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरच्या वार्षिक रथोत्सव दि.5जानेवारी पासून


राजन मामणिया व चंद्रकात शहा यांचे हस्ते होणार रथपूजन

स्थैर्य, सातारा :  येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा च्या देव देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवार दि. 5 जानेवारि 2020 ते शुक्रवार दि.10 जानेवारी 2020 दरम्यान साजरा होत आहे. कांची कामकोटी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या व महास्वामी प.पू. श्री श्री जयेंद्र सरस्वती यांच्या कृपेने व परमपूज्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे शुभाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त मंदिरात रविवार दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता ध्वजारोहण संपन्न होणार आहे. तसेच सोमवारी दि. 6 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत श्री गणपती होम होवून सायंकाळी 6वा. श्री राधाकृष्ण देवतांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होणार आहे. मंगळवार दि. 7 जानेवारीला सकाळी 6 ते 12 या वेळेत घटस्थापना होउन महागणपती,राधाकृष्ण,श्रीमूलनाथेश्वर,उमा देवी यांचा मूलमंत्र जप, होम,अभिषेक व आरती होणार आहे. नटराज मंदिरात संपन्न होणारे वार्षिक रथोत्सव सोहळयातील सर्व धार्मिक कार्यक्रम सातारा येथील वेदमुर्ती दत्ताशास्त्री जोशी यांचे अधिपत्याखाली विविध ब्रह्मवृंदाच्या सहकार्याने संपन्न होणार आहेत.

बुधवार दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव संपन्न होणार आहे.गुरुवार दि. 9 रोजी या उत्सवाचा प्रमुख दिवस असून सकाळी पाच वाजता श्री गणपती होम होउन वेद पारायण,मूर्तींचे यात्रादान विधी होउन रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. या वर्षी रथपूजन सोहळयासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या रथाचे पूजन सातारा येथील राधिका पॅलेस हॉटेलचे मालक तसेच रोटरी क्लब सातारा कँपचे माजीअध्यक्ष राजन मामणिया व त्यांच्या पत्नी सौ. गीता मामणिया यांच्या हस्ते तसेच सातारा येथील ज्येष्ठ करसल्लागार,सातारा जिल्हा आयकर करसल्लागार संघटनेचे माजी अध्यक्ष, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष चंद्रकांत शहा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जास्वंदी शहा या सर्व मान्यवरांचे शुभहस्ते हा रथ पूजन सोहळा संपन्न हाणार आहे. रथपूजन झाल्यावर नटराज मंदीर, जि. प. अध्यक्ष बंगला, साईबाबा मंदिर गोडोली, पोवईनाका, शिवतीर्थवरुन हा रथ सोहळा पोवई नाका , कुबेर विनायक मंदिर मार्गे सर्कीट हाउस वरुन नटराज मंदिर येथे सायंकाळी येणार आहे. रथाचे मंदिर प्रांगणात आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता जिल्ह्यातील विविध देवस्थान व तीर्थक्षेत्राचे महंत व मठाधिपती यांचे हस्ते रथातील देवतांची महामंगल आरती केली जाणार आहे. शुक्रवार दि. 10 जानेवारीला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चर्तुवेद पारायण होउन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होउन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे. वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन,मन,धन अर्पून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.