Your Own Digital Platform

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी सागर पाटील


स्थैर्य, सातारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी सागर दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली. पाटील यांनी पत्रकार क्षेत्रांमध्ये आजपर्यंत केलेले कामाची दखल घेऊन त्यांची पत्रकार सेवा संघ युवा प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली. पाटील यांची युवा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे पाटील यांच्या निवडीबद्दल सातारा येथील सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पाटील म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आज Aपत्रकारांवर होणारे गुन्हे व होणारे अत्याचार व खोट्या गुन्ह्यात प्रकार ओवले जाते त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. आज पत्रकारावर दररोज होणारे जीवघेणे हल्ले होत आहेत तर याला पायबंद घालण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न केला जाईल यासाठी पत्रकारांनी कशालाही न घाबरता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हानही त्यांनी केली.