Your Own Digital Platform

वैधमानशास्त्र विभागाकडून 1 एप्रिल ते 31 डिसेंबर कालावधीत


305 आस्थापनांची तपासणी 

सातारा  : सातारा जिल्हा वैधमापनशास्त्र विभागामार्फत 1 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधीत 305 विविध आस्थापनांची तपासणी करुन तपासणीमध्ये दोष आढळलेल्या 245 किरकोळ विक्रीत व उत्पादक कंपन्यावरती वजने मापे कायदा व नियम यांच्या भंगाबद्दल रितसर 245 खटले दाखल केले आहेत, अशी माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक रा.ना. गायकवाड यांनी दिली आहे.
 
या खटल्यापैकी 209 खटले प्रककरणत 9 लाख 94 हजार 750 इतके प्रशमन शुल्क शासनाकडे जमा झाला असून मुद्रांकन फी मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. वर नमुद केलेल्या खटल्यांपैकी 7 विशेष खटले बिअर व मद्य विक्रेते, ठोक विक्रेते व उत्पादकांवर नोंदविलेले असून त्यापैकी 3 खटले नियमानुसार शासनाबरोबर प्रशामित होऊन प्रशमन रक्कम रु. 1 लाख 95 हजार शासनाकडे जमा झालेली आहे.
 
हे खटले प्रामुख्याने पॅकबंद वस्तूंची छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, मुळ छापील किंमतीत खाडाखोड करणे, पॅकबंद वस्तूवर नियमानुसार आवश्यक घोषवाक्य नसणे, वस्तू खरेदी करते वेळी वजन व मापात फसवणुक करुन वजनाने मापाने वस्तू जादा घेणे वस्तु विक्री करतेवेळी फसवणुक करुन वस्तु वजनाने मापाने कमी देणे, तोलन उपकरणंची अचुकता तपासणीसाठी प्रमाणित वजने न ठेवणे, अप्रमाणित वजने व मापे वापरणे, वजने मापे विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करुन न घेणे इत्यादी कारणास्तव नोंदविलेले आहेत, असेही श्री. गायकवाड यांनी कळविले आहे.