Your Own Digital Platform

12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नोकरी करून चालवत होता उदरनिर्वाह


हॉटेलकडून वेटरसाठी परिसरातच राहण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. या खोलीतच अमोलने सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
औरंगाबाद, : हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून कुट उदरनिर्वाह एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील वेदांतनगर भागात ही घटना घडली आहे. अमोल विष्णू मोरे (वय-19) वर्षीय मृत विद्यार्थाचे नाव आहे.

अमोल हा 12 वीचा विद्यार्थी होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तो वेदांतनगर येथील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. मिळालेल्या पैशाने स्वतःचा शिक्षणाचा खर्च भागवत होता. हॉटेलकडून वेटरसाठी परिसरातच राहण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. या खोलीतच अमोलने सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोलने आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.