Your Own Digital Platform

2019चे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर


पालकमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी वितरण

स्थैर्य, सातारा : जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती, सातारा निवड समितीने सन 2019 साठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सागर जगन्नाथ जगताप (बॉक्सिंग), गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता शैलेंद्र ऊर्फ रविंद्र दत्तात्रय भारती, गुणवंत खेळाडू (महिला प्रवर्ग) कु. ऋतुजा जयवंत पवार (बास्केटबॉल), व गुणवत खेळाडू (दिव्यांग) राजेंद्र दत्तात्रय पवार (मैदानी स्पर्धा) या गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रिडा कार्यकर्ता, संघटक म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटली यांच्या हस्ते दि. 26 जानेवारी 2020 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर होणार आहे.

या जिल्हा निवड पुरस्कार समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह, सुजित शेडगे शिवछत्रपती पुरस्कार्थी, सिध्दार्थ लाटकर गणुवंत क्रीडा कार्यकर्ता, संघटक पुरस्कार्थी, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग व युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा हे होते.

पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रक्कम रुपये 10,000/- असे आहे