Your Own Digital Platform

25 जानेवारी रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवसस्थैर्य, सातारा : दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या युवक-युवती व नीवन मतदारांसाठी 25 जानेवारी रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय दिनासाठी Electoral Literacy for stronger Democracy हा विषय आयेागाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, सातारा आशा होळकर यांनी दिली. १० व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषगाने महिला, युवक, अपंग व्यक्ती. जेष्ठ नागरीक, सेना दलातील मतदार, अनिवासी भारतीय तसेच समाजाताल दुर्लक्षीत घटक यांना विचारात घेवून कृती करण्यात येणार आहे. निवडणूक साक्षरता क्लबच्या मार्गदर्शनाखाली शेक्षणिक संस्थामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. 262 सातारा विधानसभा मतदार संघामध्ये दि.25 जानेवारी,2020 रोजी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील, नगरपालिका भागातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक- युवतींनी आपली नावे समाविष्ठ करावीत ,असे आवाहन आशा होळकर सहा. मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सातारा यांनी केले आहे. दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत वय 18 पूर्ण होणा-या युवक-युवती व नवीन मतदारांनी पुराव्याचे कागदपत्रासह मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या वेबसाईटवरूनही नाव नोंदणी करू शकता. नवीन मतदार नोंदणीसाठी जन्म पुरावा- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला, ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे सहीचा असावा. आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट फोटो तसेच घरातील एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स देणे गरजेचे आहे.
 
दि. 25 जानेवारी, 2020 या राष्ट्रीय मतदार दिवसाचे निमित्ताने महिला, दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांनी मतदार नाव नोंदणी करणेसाठी जास्तीत जास्त सहभाग घेवून सहकार्य करावे. सातारा तालुक्यातील सर्व गावांतून तसेच नगरपालिका भागातून मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन आशा होळकर, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सातारा यांनी केले आहे.