Your Own Digital Platform

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत 60.51 कोटी वाढीव मागणीस मान्यता


स्थैर्य, सातारा : उपमुख्यमंत्री तथा वित्त व‍ नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत सातारा जिल्ह्याच्या 60.51 कोटीच्या वाढीव मागणीस मान्यता देण्यात आली.

पुणे येथे झालेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या निधीतून साकव, पुल, रस्ते शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाडी, सर्व शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण हे नियमित कामे करण्यात येतील तर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अपूर्ण काम पूर्ण करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विद्यार्थी वसतीगृह इमारत बांधकाम, पदनिर्मिती, कास तलाव उंची वाढवणे, जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामे, शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण करणे इत्यादी विकास कामांसाठी राज्यस्तरावरुन स्वतंत्र निधी पुरविला जाईल, असे सांगून पुसेगाव, औंध, शिंगणापूर, पाल, मांढरदेव, श्रीराम फलटण, म्हसवड येथील सिद्धनाथ व नाईकबा या यात्रा स्थळांचा विकास राज्यस्तरीय शासकीय निधीतून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.