Your Own Digital Platform

महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत आकाशवाणीवर उद्या सायंकाळी 7.30 वा जिल्हाधिकारी सिंघल यांची खास मुलाखतस्थैर्य, सातारा : जिल्ह्यात महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेसाठी एकूण 12 हजार 708 शेतकऱ्यांच्या आधार कार्डची माहिती उपलब्ध नाही. बँकेमार्फत अशा शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्ड लिंक करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज आकाशवाणीवरील मुलाखती दरम्यान दिली.

ही मुलाखत सातारा आकाशवाणीवर उद्या सायंकाळी 7.30 वा “ किसानवाणी ” या कार्यक्रमात प्रसारित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी एक ग्रीन लिस्ट तयार करण्यात येईल व त्यानुसार बँक खाती लिंक करण्यात येतील. जर शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न केले नसेल तर त्वरीत बँकेशी संपर्क साधून आधार कार्डची माहिती द्यावी असेही आवाहन श्रीमती सिंघल यांनी केले आहे.