Your Own Digital Platform

8 जानेवारीच्या ग्रामीण भारत बंद आणि रास्ता रोकोमध्ये सहभागी व्हा- स्वाभिमानी शेेतकरी संघटना


गोपूजमध्ये रास्ता रोको आंदोलन


औंध : केंद्र सरकारने RCEP हा राष्ट्रीय करार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे चीन, जपान, आॅस्ट्रेलिया,न्युझीलंड, पाकिस्तान यासारख्या 16 देशांबरोबर करार होणार आहे त्यामुळे या करारात सहभागी असनाऱ्यां देशात आयात निर्यात शुल्क नसेल. त्यामुळे देशातील दूध,दुग्धजन्य आणि शेतमाल मातीमोल भावाने विकले जाईल, त्यामुळे RCEP करारातून दुग्धजन्य पदार्थ व शेतमाल वगळण्याच्या मागणीसाठी आणि संपूर्ण सातबारा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विविध 265 शेतकरी संघटनांनी 8 जानेवारी रोजी ग्रामीण भारत चे बंद आयोजन केले. त्याचाच भाग म्हणून खटाव तालुक्यातील मौजे_गोपूज_येथे_ सकाळी ठीक 9 वाजता रास्ता_रोको केला जाणार आहे. महा विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी निवडणूकीत सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणेच आम्हाला संपूर्ण कर्ज माफी म्हणजे आमचा सातबारा कोरा करावा आणि जयसिंगपूर उसपरिषदेत ठरल्याप्रमाण यंदा उसाला एकरकमी एफ आर पी अधिक 200 रुपये तातडीने अदा करावे तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे विजबिल माफी द्यावी या मागन्याही रा रास्ता रोको आणि आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. या सर्व मागण्या सामान्य ग्रामीण भागातील लोकांचे अर्थकारण आणि जीवनमान उद्धवस्त करणार असल्याने यामध्ये अनेक शेेतकरी उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना या भारत बंद आंदोलनामध्ये सक्रिय सामील होत आहे त्यामुके जास्तीत जास्त शेतकरी आणि ऊस उत्पादक आणि कर्जदारांना यामध्ये सहभागी व्हावेअसे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. या निवेदनावर राज्य प्रवक्ते अनिल पवार ,माजी सभापती पिंटू पैलवान स्वाभिमानीचे पक्षाअध्यक्ष श्रीकांत लावंड, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, भुजबळ मामा ,दत्तूकाका घार्गे, प्रमोद देवकर, नितीन देशमुख, सचिन पवार विनोद खराडे,बाबासो घार्गे आणि नितीन शिंदे, ज्ञानेश्वर जाधव आदींच्या सह्य आहेत.