Your Own Digital Platform

आजचा दिवस


शके १९४१, विकारीनाम संवत्सर, शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२०, पौष पौर्णिमा,शाकंभरी पौर्णिमा, चंद्र - मिथुन राशीत, नक्षत्र- आर्द्रा दुपारी २ वा. ४९ मि. पर्यंत नंतर पुनर्वसू, सुर्योदय- सकाळी ७ वा. १५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १७ मि.
 
नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत रहात आहे. आजचा दिवस प्रतिकूल दिवस आहे. आज रवि - चंद्र प्रतियोग, बुध - रवि युतीयोग, बुध - चंद्र प्रतियोग, शनि - चंद्र प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ,मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ व मीन या राशिंना अनुकूल तर कर्क, वृश्चिक व मकर या राशिंना प्रतिकूल जाईल.
 
मेष-             मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून कामे यशस्वी कराल. नवी दिशा सापडेल.
 
वृषभ-         कुटुंबातील व्यक्तींकरिता वेळ देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. उधारी वसूल होईल.
 
मिथुन-      दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. उत्साही व आनंदी रहाल.
 
कर्क-       प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवावित. महत्त्वाची कामे नकोत.
 
सिंह-      प्रवास सुखकर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
 
कन्या-    नोकरीतील कामात सुयश लाभेल. व्यवसायतील महत्त्वाची कामे यशस्वी कराल. तुमचा प्रभाव                       राहील.
 
तुला-      नवीन मार्ग दिसेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. 

वृश्चिक-  महत्त्वाची कामे नकोत. काहींना नैराश्य जाणवेल. प्रवासात काळजी घ्यावी.
 
धनु-    तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही तुमची महत्त्वाची कामे यशस्वी करणार आहात. 

मकर-   विनाकारण वेळ वाया जाईल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. मनोबल कमी राहील.
 
कुंभ-    महत्त्वाचे निर्णय घ्याल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रवास सुखकर होतील.

मीन-   आनंदी व आशावादी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
 
आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
 
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४