Your Own Digital Platform

अभिरुप बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर : बागल

जि.प. शाळेतील अभिरूप आठवडा बाजारात खरेदीसाठी उडालेली झुंबड


स्थैर्य, कातरखटाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या अभिरुप बाजाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिक पाटील, समीर पाटील, दत्तात्रय बोडके, अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

बागल म्हणाले की लहान मुलांमध्ये जिज्ञासा व चिकाटी हे दोन चांगले गुण असतात. बाजारासारख्या उपक्रमामुळे त्यांच्या या कलागुणांमध्ये वाढ होण्यास मदत होणार असून शाळेच्या वतीने राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम कौतुकास्पद आहेत.
 
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्याच्या दुकानासमोर जावून माहिती घेत कौतुक केले.दरम्यान, बनपुरी व एनकुळ येथील जिल्हा परिषद शाळेतही अभिरुप बाजार भरविण्यात आला . लहान मुलांनी सकाळी सकाळी गोळा केलेल्या ताज्या भाज्या, फळे , स्नॅक्स, कोसमटिक्स आदी वस्तू ची हातोहात विक्री झाली.
 
कातरखटाव येथील बाजार यशस्वीतेसाठी रेखा बागल, राजकुमार काटकर, मनिषा शिंगाडे, चंद्रकांत लाटे, चंद्रकांत जाधव यांनी तर बनपुरी च्या बाजार यशस्वीतेसाठी उपशिक्षक दत्तात्रय पानस्कर, रफीक मुलाणी, आप्पासाहेब शिंगाडे, तेजस्वी पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळ पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय शिक्षणा बरोबरच व्यवहारीक ज्ञान अवगत होण्यासाठी भरविण्यात आलेल्या अभिरुप बाजारामुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन उपसरपंच अविनाश उर्फ संतोष बागल यांनी केले.