Your Own Digital Platform

युवकांना सोबत घेऊन काम करणार : राज्यमंत्री आदिती तटकरेमाहिती व जनसंपर्कसह विविध खात्यांचा स्वीकारला कार्यभार 


स्थैर्य, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार व राज्यातील सर्वच मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व युवकांना सोबत घेऊन आपण आगामी काम करणार असल्याचे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार या विभागांचा कार्यभार विकताना व्यक्त केल्या. 

मंत्रालयात दालन क्र.2, तळमजला, मुख्य इमारत हे त्यांचे कार्यालय आहे. यावेळी आमदार शेखर निकम, अनिकेत तटकरे, माजी आमदार संजयराव कदम, आई वरदा तटकरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी मला देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. या जबाबदारीतून जनतेचे काम प्रामाणिकपणे करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. युवकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.