Your Own Digital Platform

प्रशासनाने एकसंघपणे काम करावे, जिल्ह्यात विकासाच्या माध्यमातून लोकांना न्याय देणार : पालकमंत्री बाळासाहेब पाटीलदुकानदारांना बाहेर सी.सी.टीव्ही लावण्यास प्रोत्साहित करावे : ग्रामपंचायतीचा अधिकचा निधी बंदीस्त गटरांसाठी खर्च करावा

स्थैर्य, सातारा : जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाबरोबर अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटाच्या काळात जिल्ह्यातील प्रशासनाने एक संधपणे चांगले काम केले, यापुढेही जिल्ह्याच्या विकासासाठी असेच एक संधपणे काम करुया. सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेवूया, प्रतिपादन सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेच्या‍निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसरंक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येक विभागाला निधी प्राप्त झाला आहे, हा निधी 100 टक्के खर्च करण्यावर भर देवून सर्वसमान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, निधी खर्च करण्यासाठी कालावधी कमी राहिलेला आहे या निधीच्या खर्चासाठी झोखून देवून काम करा. तसेच जिल्ह्यात विविध योजना समक्षपणे राबवा. सातारा येथील दुकानदार दुकानाच्या सुरक्षेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावतात, या दुकानदारांना त्यांच्या व लोकांच्या सुरक्षततेसाठी दुकानाच्या बाहेरही सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलीस विभागाने प्रोत्साहित करावे. मार्च नंतर वनांमधील पाण्याचे स्त्रोत आटतात यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात. हे जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून पाण्याचे स्त्रोत अधिक बळकट करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी केल्या.

सहकारी सोसायट्याच्या बळकटीकरणासाठी पथदर्शी कार्यक्रम राबावावा. जिल्हा परिषदेतला ग्रामपंचायतीतील कामांसाठी निधी दिला जातो हा निधी जास्तीत जास्त बंदीस्त गटारांसाठी खर्च करावा. पालकमंत्री व राज्यमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून जास्तीचा निधीसाठी प्रयत्न केला जाईल, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.