Your Own Digital Platform

पुण्यातील व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी एकजण ताब्यातसातारा : पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय ४८, रा बंडगार्डन पुणे) यांच्या खूनप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पुण्यातून एकाला अटक केली असून, या खून प्रकरणाचा लवकरच आता उलगडा होणार आहे.

आफ्रिदी खान (वय २७, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चप्पल व्यापारी चंदन शेवाणी यांचे शनिवारी रात्री अज्ञातांनी अपहरण करून फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे आणले. या ठिकाणी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

हा खून दोन कोटींच्या खंडणीसाठी झाला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर काही तासांतच पुण्यातून आफ्रिदी खान या व्यक्तीला संशयित म्हणून अटक केली आहे. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत असून, लवकरच या खुनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.