Your Own Digital Platform

पत्रकार 'आतून' जळतो, म्हणून, समाज फुलतो..! यशेंद्र क्षीरसागरसमाजात काही चांगले घडायचे असेल, तर कोणालातरी राबावे लागते, कोणालातरी खपावे लागते,,कोणालातरी ध्येयासाठी गाडून घ्यावे लागते, कुणाचा तरी जीव फुटावा लागतो, छातीमध्ये ध्येयाचा अंगार फुलावा लागतो, काळीज जळावे लागते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अग्नीतून ध्येय प्राप्ती करून घ्यावी लागते असे निवडक घटक समाजात आहेत ज्यांच्या कष्टामुळे राबत राहण्यामुळे समाज घडत असतो फुलत असतो.पत्रकार हा शब्द केवळ बातमी छापणे या कृतीची संबंधित नाही.जे काही घडतंय ते आपल्यासमोर मांडले ते लिहून काढलं ते छापलं आणि ते वर्तमानपत्र साप्ताहिक मासिक यातून छापून ते खपलं की झालं पत्रकाराचं काम.....असं कधी नसतं...सहा जानेवारी अठराशे 32 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी या हेतूने पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली तो हेतू तळागाळातील समाजाला आपल्या लेखणीतून न्याय मिळावा अन्यायाला वाचा फोडावी गोरगरीब वंचित पीडित शोषित ज्यांना आपले म्हणणे मांडण्याचा वाव नाही त्यांचे म्हणणे संपूर्ण समाजासमोर मांडावे असा होता.आज कितीही व्यावसायिकता आली तरी पत्रकार आतून समाजासाठी जळत असतो......!!विविध समस्या मांडत असतो बातमी हा त्याचा जीव असतो.आरोग्य शिक्षण बांधकाम समाज सेवा समाज कल्याण अशा अनेक अँगलमधून आपल्या लेखणीचा संचार करत पत्रकार हा समाजासाठीच पळत असतो प्रत्येक क्षेत्रात काही कमी-जास्त असतेच त्याप्रमाणे ही व्यावसायिकता बऱ्याच अंशी अपरिहार्य बनली आहे.महाराष्ट्राला किंबहुना भारताला राबणाऱ्या झटणाऱ्या पत्रकारांचा मोठा इतिहास आहे.लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर अशी ही फार मोठी उज्वल परंपरा आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे लेख असोत की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निबंध असो अथवा काळ करते शिवरामपंत परांजपे यांचे लेखन असो या सर्वा तून पत्रकारांचे आगळीवेगळी काळीज प्रत्ययास येते.संतांचा समाजसुधारकांचा विचार केला तरी कुठेतरी समाजासाठी लिहिणे हा धागा समान दिसतो.त्यातूनच पत्रकार जन्माला येतो.समाज सुधारक तर अनेक वेळा पत्रकार अथवा साहित्यिक होते महानायक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत ,मूकनायक ही साप्ताहिके मासिके प्रकाशित केली.त्यातून समाजासाठी तळमळीने उत्कटतेने लेखन केले महान समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र महान समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी "समाजस्वास्थ्य" मधून परखड लेखन केले .त्यावेळी अस्पृश्य समजला जाणारा निंदेला धनी असणारा कुटुंब नियोजन हा विषय त्यांनी मोठ्या धाडसाने समाजस्वास्थ्य मधून संयमी स्वरूपात हाताळला.त्यावेळी त्याची खूप निंदा झाली धर्मात ढवळाढवळ करणारे विचार आणि कौटुंबिक जीवनात डोकावणारा आगाऊपणा अशा भाषेत अवहेलना झाली......परंतु कर्वे डगमगले नाहीत प्रचंड अपमान अवहेलना सहन करीतच त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.आज कुटुंबनियोजनाचा एकविसाव्या शतकात डंका वाजवला जात आहे.कुटुंब नियोजन करणाऱ्या साधनांची खुलेआम स्वतः सरकार जाहिरात करीत आहे.मात्र आज रघुनाथ धोंडो कर्वे आपल्या सोबत नाहीत.तरीही लेखणीची ताकद आपल्याभोवती तेजोवलय बनवून उर्जा देत आहे अठराचे 56 सली यांचा जन्म झाला ते दोघेही जिवलग मित्र लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी संपूर्ण जीवन समाजसेवा समाज सुधारणा यासाठी व्यतीत केले आणि असे करत असताना पत्रकारिता हा त्यांनी जीव की प्राण मानला. पत्रकारिता हे फार मोठे शस्त्र मानली आणि शब्दांच्या फटकार यांनी जग जिंकले समाजाविषयी तळमळीने प्रश्न मांडले स्वातंत्र्य सामाजिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा अशा अनेक विषयांना स्पर्श केला अठराशे 81 सालि लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली मोठ्या कष्टाने चालवली प्रतिकूल परिस्थितीत लेखन केले.सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ,राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे; अशा अग्रलेखातून जळजळीत पणे सामाजिक समस्यांवर राजकीय भूमिकांवर कोरडे ओढले.लोकमान्य टिळकांची पत्रकारिता जितकी जहाल तितकी काळजात घुसणारी होती.अठराशे अष्टयात्तर मध्ये दसऱ्याच्या दिवशी गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक वर्तमानपत्र काढले सामाजिक सुधारणा किती महत्त्वाच्या आहेत हे समाजाला पटवून दिले.त्यांचे पत्रकारिते वरील प्रेम अत्यंत उत्कट होते या प्रेमापोटी समाजाच्या तळमळी पोटी त्यांनी वजनांचे सर्व जातीचे बोलणे खाल्ले अवहेलना अपमान सहन केला गोपाळ गणेश आगरकर यांना स्वतःच्या हयातीतच म्हणजेच स्वतःच्या जिवंतपणीच स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा पहावी लागली....त्यांच्याच समाजाने त्यांना बहिष्कृत केले अठराशे 56 ते अठराशे 95 अशा केवळ 39 वर्षांच्या आयुष्यात गोपाळ गणेश आगरकरांनी पत्रकारितेतून सामाजिक प्रश्न स्त्रियांचे प्रश्न अस्पृश्यांचे प्रश्न शोषितांचे वंचितांचे प्रश्न मोठ्या हिमतीने मांडले याच काळात महान समाजसुधारक महात्मा फुले यांनीसुद्धा दीनबंधू मधून प्रखर लेखनास प्रोत्साहन दिले.काळकर्ते शिवरामपंत परांजपे असोत की विष्णुशास्त्री चिपळूणकर असोत अशा अनेकांनी पत्रकारिता हा आपला धर्म, "खिचो ना कमानको ना तलवार निकालो जब तोफ हो muqabil तो अखबार निकालो" अशा भाषेत पत्रकारितेचा यज्ञ मांडला.आजही पत्रकारांचे महत्त्व तितकेच अबाधित आहे.शिक्षण आरोग्याच्या समस्या आहेत सामाजिक उलथापालथ होत असते वाढत्या लोकसंख्येचे प्रश्न आहेत आर्थिक समस्या आहेत भारत देश तरुणांचा आहे समाज कल्याण विषयक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे एखाद्या शहरात या एखाद्या चौकात अथवा रस्त्याकडेला कचरा पडलेला असेल तरी आपल्याला संबंधित सरकारी यंत्रणेची आठवण तर होते पण दुसऱ्याच क्षणी पत्रकारांची आठवण येते .....ही समस्या कोठे छापून आली आहे काय,अशी भावना माणसाच्या मनाला स्पर्श करून जाते पत्रकारितेचे महत्त्व लक्षात येते.वाचकांची पत्रे असोत ,अग्रलेख असो, विशिष्ट महत्त्वाच्या पुरवण्या असोत, महत्त्वाची राजकीय वार्तापत्र असोत अशा अनेक अंगांनी पत्रकारितेचा एकाप्रकारे आनंदच समाज घेत असतो.क्रीडा समीक्षा चित्रपट परीक्षण या बाबी एका बाजूला सुतकी बोधकथा राशीभविष्य विनोद असत अशा सर्व दृष्टींनी पत्रकारिता खोलवर रुजत आहे पी साईनाथ, रविष कुमार, जसवंत सिंग अशा पत्रकारांमुळे पत्रकारितेचे महत्त्व अबाधित आहे प्रचंड कष्टाने आणि सांगोपांग अभ्यासाने लेख लिहिले जातात.अग्रलेख लिहिले जातात समस्या मांडल्या जातात असे बहुआयामी बहुमुखी समाजाभिमुख क्षेत्र म्हणजे पत्रकारिता होय ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही बाबी हातात हात घालून चालत असताना समाजातील अंतर्गत ढवळाढवळ उलटापालट प्रकर्षाने समाजासमोर मांडणे हे पत्रकारांचे व्रत असते आज पत्रकारांनाही अनेक समस्या भेडसावत असताना पत्रकारिते वरील त्यांचे प्रेम तसूभरही ढळत नाही.एखाद्या वर्तमानपत्राची एखादी पुरवणी देखील प्रसिद्ध करायची म्हटले तर त्यामागे किती कष्ट असतात हे एखाद्या पत्रकाराला उपसंपादकाला अथवा संपादकाला विचारलेले बरे...!!आपले लेखन प्रसिद्ध भावी आपली कविता प्रसिद्ध व्हावी अशी सामान्य नागरिकाला वाटते आणि ते प्रसिद्ध झाल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.ही पत्रकारितेची फलित आहे एकूणच चहूबाजूंनी पत्रकार समस्यांची भिडत असताना स्वतः समस्या समाजासाठी झटत असतो म्हणूनच त्यांच्या लेखणीला पत्रकारितेला आज पत्रकार दिन दिवशी मनःपूर्वक सलाम....!