Your Own Digital Platform

सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे ‘नवरत्न दर्पण’ पुरस्काराने सन्मानितस्थैर्य, सातारा : मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन यांचे वतीने पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी सहकार क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्राप्त केलेली सफलता व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन त्यांना ‘नवरत्न दर्पण’ पुरस्काराने’ गौरवण्यात आले आहे.
 
सदर पुरस्कार मा.खा. श्रीनिवास पाटील व मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, यांचे हस्ते तसेच सातारा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. माधवी कदम, श्री. सारंग पाटील, पत्रकार महासंघाचे अध्यक्ष श्री. हरीष पाटणे, श्री. विनोद कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. सरकाळे यांना प्रदान करणेत आला.
 
यावेळी बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, कृषी विकासासाठी डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे व कृषीच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनात अमुलाग्र बदल घडवून कृषी क्रांती केलेली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली शेती, शेती पूरक व्यवसाय व बँकिंग या संदर्भात सखोल अभ्यास करणेकरिता डॉ. सरकाळे यांनी जवळपास ३० देशांना भेटी दिल्या. तसेच आपल्या विविध पुस्तकातून पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी,कृषी उत्पादन ते निर्यातीपर्यंत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेमध्ये विविध उपक्रम राबवून, आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या कल्याणासाठी तसेच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावणेसाठी बँकेच्या माध्यमातून त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. बँकेच्या कामकाजात नाविन्यपुर्नता ठेवत त्यांनी बँकेला लौकिक प्राप्त करून दिला आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणेसाठी तसेच तंत्रज्ञानाची जोड देताना येणाऱ्या तांत्रिक व आर्थिक अडचणी, कृषी उत्पादन वाढविणेपासून ते निर्यातीपर्यंत ,शेतकरी सभासदांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, एकंदरीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जे प्रयत्न केले त्याची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी या दृष्टीने बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात ६०० हून अधिक शेतकरी मंडळाची स्थापना केली आहे व आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच विविध सहकारी संस्थांवर संचालक ते अध्यक्ष या पदांवर काम करीत असताना आधुनिक शेती करणे , पिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच मिळालेल्या उत्पादनास योग्य बाजारपेठ मिळून देणे यासाठी प्रयत्न केले. महिला सक्षमीकरनासाठी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटाना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देऊन मार्गदर्शन केले आहे.
 
बँकिंग कामकाजाबरोबरच शेती विषयक ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. सातारा आकाशवाणीवरून कृषि तंत्रज्ञानाविषयी सहा महिन्यांचे मालिकाचे प्रसारण केले. दूरदर्शन,मुंबई तसेच सहयाद्री वाहिनी व सुकृत चॅनेल्सचे माध्यमातून जवळपास ५० कार्यक्रमांव्दारे शेतीविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. ग्रीन हाऊस, जलसंधारणाचे महत्व याकरिता माहितीपटांची निर्मिती केली. शेती विषयक विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थींना व्याख्याने तसेच प्रशिक्षण दिले. तसेच डॉ. राजेंद्र सरकाळे विविध सहकारी संस्थांवर संचालक ते अध्यक्ष या पदांवर कार्यरत आहेत.
  
डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सामाजिक, कृषी व बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रातील विविध सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. डॉ.राजेंद्र सरकाळे यांना गतवर्षी बँकिंग फ्रंटायर्स मुंबई,कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, कोल्हापूर तसेच राज्य बँक असोसिएशन मुंबई यांचेवतीने ‘उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्काराने सन्मानित केलेले असून सर्वंकष बाबींची नोंद घेवून त्यांना विविध संस्थांनी जवळपास २० राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.
 
डॉ.राजेंद्र सरकाळे यांना सदर पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे अध्यक्ष मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र विधान परिषद सभापती व बँकेचे संचालक मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सर्व संचालक मंडळ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सरव्यवस्थापक श्री . राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे , सर्व विभागांचे व्यवस्थापक अधिकारी व सेवक, गटसचिव, सहकार क्षेत्रातील आजी-माजी, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.