Your Own Digital Platform

सुरज निकमने औंधचे मैदान मारले विजय गुटाळवर दुसऱ्या मिनिटात मात. प्रेक्षणीय कुस्त्यानी डोळ्याचे पारणे फिटले

औंध कुस्ती मैदानात विजय गुटाळला चितपट करत सूरज निकमने विजेतेपद पटकाविले

स्थैर्य, औंध : औंधच्या मैदानात धुमछडी येथील सुरज निकमने कोल्हापूरचा विजय गुटाळ याला घुटना डावावर चितपट करून प्रथम क्रमाकांचे बक्षीस पटकावले. यावेळी मैदानात प्रमुख कुस्त्याशिवाय अन्य लढतीही रंगतदार झाल्यामुळे कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. महिला कुस्तीगीरांनी देखील चटकदार कुस्त्या करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.
 
येथील श्रीयमाईदेवी यात्रेनिमित्त श्रीयमाईदेवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि कुस्ती कमेटीच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती कुस्ती कमेटीचे अध्यक्ष वसंतराव माने, उपाध्यक्ष सदाशिव इंगळे, कार्याध्यक्ष नारायण इंगळे, हणमंतराव शिंदे, रमेश जगदाळे, संतोष भोसले, किसन आमले, प्रशांत खैरमोडे, राजेंद्र माने, अनिल माने, गणेश देशमुख, वसंत जानकर, दीपक नलावडे, किसन तनपुरे, आप्पा इंगळे, अमरशेठ देशमुख यांच्या उपस्थितीत लावण्यात आली.

प्रेक्षणीय लढतीत सुरजने सुरवातीलाच विजयवर ताबा घेऊन दुसऱ्या मिनिटात विजयला चितपट करून ही प्रतिष्ठेची लढत जिंकली. सुरज च्या चटकदार कुस्तीमुळे उपस्थित ग्रामस्थ आणि कुस्ती शौकिनांंनी जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत. कोल्हापूरच्या संतोष दोरवडला पराभव पत्करावा लागला. पुणे येथील विष्णू खोसेने त्याला लपेट मारून पराभूत केले. पुणे येथील संदीप काळे याने सातारच्या राजेद्र सुळला घिस्सा डावावर आसमान दाखवले. तसेच छडीटांग डावावर विकास सूळ (सातारा) याने जाखणगांवच्या प्रशांत शिंदे याला पराभवाची धूळ चालली.

राघु ठोंबरे (ठोंबरेवाडी) संग्राम सुर्यवंशी (लांडेवाडी), आखिल शेख (औंध), मनोज कदम (नांदोशी), प्रुथ्वीराज पाटील (मांडवे) शरद पवार (पारगाव), अक्षय कदम (साप), रितेश सर्वगोड (येळीव), अनिकेत चव्हाण, (कोंबडवाडी), ,अमोल नरळे (सांगली), करण येवले, जयेश यादव (वडी), वैभव येवले (त्रिमली), साहिल शिंदे (अंभेरी), तेजस धमाले (सैदापूर), ओंकार सरगर (खडुस), ओंकार शिंदे, सुहेल शेख, विश्वजीत आमले कार्तिक शिंदे ,सनी इंगळे, (औंध) उदय लोंढे, मंगेश माने, प्रविण शेरकर (रहिमतपूर) यांनी प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच साक्षी मोरे, दिप्ती येवले, शिवानी जाधव, मोनाली गायकवाड, सानिया महानवर या महिला मल्लांनी चटकदार कुस्त्या केली.
 
पंच म्हणून सदाशिव पवार, आकाराम आमले, रसूल शेख, आप्पा इंगळे, के.टी कांबळे, नितीन शिंदे, किसन आमले, वसंत जानकर, नाथा धोत्रे, प्रा सुधाकर कुमकर, बाळासाहेब पडघम, आबा सूळ,अधिक जाधव, बापू चव्हाण, यांनी काम पाहिले.


माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे, शिवाजीराव सर्वगोड, नंदकुमार मोरे, प्रा. अर्जून खाडे, डॉ विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, डॉ महेश गुरव, प्रा बंडा गोडसे, सपोनि उत्तमराव भापकर, चंद्रकांत पाटील, नवल थोरात, हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, आबा सुळ, दत्तात्रय जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
उमेश पाटील मांडवे आणि जोतीराम वाजे सांगली यांनी समालोचन करून मैदानाची रंगत वाढवली.

मैदानाच्या सुरवातीला धकटवाडीचे सुपूत्र शहीद जवान ज्ञानेश्वर जाधव आणि पारगावचे मल्ल शरद ठोंबरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना उपस्थितांनी श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले.