Your Own Digital Platform

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षास्थैर्य, सातारा : माण तालुक्यातील एक आश्रमशाळेतील स्वयंपाकी शहाजी आनंदराव पाटोळे याने एका अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली.
 
याबाबतची अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील एक आश्रमशाळेत 11 सप्टेंबर 2015 रोजी स्वयंपाकी आरोपी शहाजी आनंदराव पाटोळे (वय : 37, रा. गोंदवले खुर्द ता. माण जि. सातारा) याने पिडीत अल्पवयीन मुलगी तब्येत ठीक नसल्यामुळे आश्रमशाळेच्या होस्टेलमध्ये थांबली असताना त्या ठिकाणी जाऊन त्या पीडित मुलीस दमदाटी करून आश्रमशाळेच्या स्वयंपाकाच्या खोलीत असलेल्या बाथरूम नेऊन तिच्यावर अत्याचार करून तू कोणास सांगितल्यास तुला जीवे मारीन अशी धमकी दिली. असा मजकुराचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
सदर गुन्हयाच्या तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी केला. त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले तसेच वैदयकीय पुरावा जमा केला. बारकाईने तपास करुन आरोपीविरुध्द मा. जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोप दाखल केले. वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकार पक्षाच्या वतीने सहा.जिल्हा सरकारी वकील अजित पी. कदम(साबळे) यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये पंधरा साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैदयकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. के. मलाबादे, यांनी आरोपीला दोषी ठरवून सोमवार दि. 6 जानेवारी 2020 रोजी आरोपी शहाजी आनंदराव पाटोळे (वय : 37 वर्षे,) रा. गोंदवले खुर्द, ता. माण, जि.सातारा) याला 10 वर्षे सक्तमजुरी व दंड दहा हजार रुपये आणि दंड न भरलेस पंधरा दिवस शिक्षा प्रमाणे शिक्षा दिली. दंडाची रक्कम पिडीत मुलीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिले.
 
याकामी सरकारी वकील यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉड दहिवडीचे पो. हवा. दिपक शेडगे, प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पो. हवा. दत्तात्रय जाधव, पो.ना. नानासाहेब कारंडे,पो. हवा. जयवंत शिंदे, पो.कॉ.अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.